Saturday 20 August 2011

माय मराठी


इंग्रज निघुन गेले
पण गेली नाही गुलामी
शिक्षणाच्या बाजारात
माय मराठीची निलामी .

फुले

कशी फुलतील फुले
कशी नटेल घरित्री
मुलीच्या जन्माला
गर्भाशयातच कात्री

घड्याळ्याचे डोळे

झोप घेण्यासाठी
घड्याळाला डोळे असते जर
तर कुणी केला असता
भल्या पहाटेचा गजर .

ऑस्कर


जगावर तळपळला
भारतीय संगीताचा भास्कर
रहमानला मिळाला
प्रतिष्टित ऑस्कर .

मुलगी


स्त्रीमुक्तीवादी हे तीचे बिरुद
मला उगीचच बोचले
शेजारीच राहते माझ्या
कालच तिच्या मुलीने नाक टोचले .

उस


हिरवी पिवळी पाने
ओबड धोबड खोड
अशा त्या उसातला
रस मात्र गोड

ट्रक

वर्दळीचा रस्ता
त्यावर ट्रक भरधाव
जीवघेणा अपघात
न भरणारे घाव .

खिचडी

भांडे धुवून घेण्याचा
पाळला नाही नियम साधा
अंगणवाडीच्या बालकाना
खिचडीतून विषबाधा

मैत्री


आम्ही दोन
आमची एक गुणाची
घरात खेळण्याचे दुकान
पण मैत्री नाही कुणाची .

Wednesday 17 August 2011

भेट


कुमक पोहचण्यासाठी
थोडासा झाला उशीर
शत्रूने भेट पाठविले
आमच्या सेनापतीचे शीर .

सकाळ


वेळ पाहून उठायला
झोपडीत घड्याळ नसते
आणि सुर्यावाचून
सकाळ नसते

क्रोध


आनंदी मनाला
आवरत नाही हसू
क्रोधात मात्र होतो
माणसाचा पशू

दुकान


वर्दळीच्या रस्त्यावर
कुणी पसरविले खिळे
पंचर दुरुस्तीचे एक दुकान
रस्त्याच्या पलीकडे .

निश्चय


चला उठा , पळा
सांगते घोगांवणारे वादळ
आम्ही निश्चयाचे पक्के
नाही हलवणार तळ .

खरे दान


खरे दान
भुकेल्याला द्यावे अन्न
खरे उपकार
विषष्ण मन करणे प्रसन्न

छकूली


छकूलीला मी काय चारु
तोंडात मधुर घास
छकूलीला मी काय देऊ
मनाचा ठाम विश्वास

दिवसाचा उजेड


लुकलुकणार्‍या चांदणीला
रात्रीच्या अंधाराचे वेड
जीव कासाविस होतो
बघून दिवसाचा उजेड

दुनिया


दुनिया एक तमाशा
कुणाला आशा
कुणाच्या पदरी
येतसे निराशा .

मावळता सुर्य


कोण म्हणत
सुर्य संध्याकाळी मावळतो
काळ मोठा बलवान
रोज त्याचा गळा आवळतो .

लहान बालक

स्वत:मधील लहान बालक
नेहमी ठेवावा जीवंत
बालक होवून खेळतांना
मनाला न वाटावी खंत .

दगड


लेणी मधला प्रत्येक दगड
आज झालाय कुरुप
जमेल तेथे नाव लिहिण्याचा
आम्हाला भारी हुरुप !

सिमा


 चुळबूळ करायला लागला केस
त्याला धाक दाखवावा कात्रीचा
सिमेवरच्या दहशतवाविरुध्द सशस्त्र
कारवाई
हाच एकमेव उपाय खात्रीचा

आंब्याचे झाड


निसर्गातल्या सृजनशक्तीचा
मला अविष्कार झालाय
मी लावलेल्या आब्यांच्या झाडाला
नुकताच मोहोर आलाय .

सत्कार


आंधळ्याला पत्र लिहून दिले
हात जोडून मानले त्याने उपकार
माझ्या आतावरच्या शिक्षणाचा
हाच सर्वांत मोठा सत्कार 


साप – गारुड्याचा खेळ


लोकांना हे चांगलेच ठावूक
बनावट आहे साप गारुड्याचा खेळ
लोक तरीहीमन लावून पाहतात
ऐरवी बिचार्‍यांचा जात नाही वेळ


मानव


कुणी दाखवला टिळा , क्रॉस
कुणी काढून दाखवल जाणव
चिन्हाच्या या भाऊगर्दित
माझी नजर शोधत राहीली मानव !

विचार


कृती वाचून विचार
रात्री उशिरा पर्यंतची खलबत
जणू शिडाशिवाय नावा
आणि वाळूवरती गलबत .